चंद्रपूर - मनसे शहरअध्यक्ष मनदीप रोडे वर चुकीचा गुन्हा दाखल केला असून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणात लक्ष देत हा गुन्हा परत घ्यावा अशी मागणी मनसेचे सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील भटाळी येथे GRN कम्पनीचे ऑफिस आहे, त्या कंपनीत स्थानिकांना रोजगार देण्याची मागणी शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांनी केली मात्र कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केले.
कोणत्याही कंपनीत स्थानिक कामगारांना घेणे हा कायदाच आहे मात्र संबंधित कंपनीने तो कायदा पाळला नाही, त्यामुळे त्या ठिकाणी उद्रेक झाला व तोडफोड करण्यात आली.
मात्र तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नाही उलट 395 कलम (दरोडा टाकणे) अशी गंभीर कलम रोडे यांचेवर दाखल झाली, मनदीप रोडे वर दाखल झालेला गुन्हा हेतुपरस्सर पणे दाखल करण्यात आला असून गृहमंत्री देशमुख यानी या प्रकरणात लक्ष देत दाखल कलमाची चौकशी करावी अशी मागणी गडकरी यांनी केली आहे.
तोडफोड नंतर मनसेचे शहर अध्यक्ष मनदीप रोडे पसार झाले, दुर्गापूर पोलिसांनी आतापर्यंत एकूण 23 जणांना या प्रकरणात अटक केली आहे, मनसे सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी एकदा तरी अटक झालेल्या कुटुंबियांची भेट घेणे आवश्यक होते. #News34chandrapur
या बाबत News34 ने अटकेत असलेल्या आरोपींच्या कुटुंबियांची भेट घेतली असता त्यांचा आक्रोश त्यावेळी बघायला मिळाला, मुलगा, वडील व पती यांनी आजपर्यंत असे कोणत्याही आंदोलनात सहभाग घेतला नाही, अटकेत असलेल्या कुणाचे पती, वडील व मुले यांच्या कुटुंबियांसमोर रोजंदारी चा प्रश्न उभा झाला आहे, आज त्यांची परिस्थिती केविलवाणी झाली आहे,
अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नातेवाईक पोलीस स्टेशनच्या बाहेर उभे असतात, आमच्या मुलांना, पतीला व वडीलाला नेत्यांनी यांनी फूस लावून त्या आंदोलनात नेले असे स्पष्ट आरोप कुटुंबीय करीत आहे.
अटकेत असलेल्या आरोपींच्या कुटुंबाची जबाबदारी मनसे घेणार का हा सध्यातरी मोठा प्रश्नच आहे.
