चंद्रपूर - ग्रीन प्लानेट सोसायटीने ह्यापूर्वी अनेक वर्षांपासून रामाळा तालावाच्या प्रदूषणाच्या प्रशासनाकडे तक्रारी केलेल्या आहेत परंतु प्रशासनाने मात्र दुर्लक्ष केले, सध्या इको प्रो संस्थेद्वारे सुरू असलेल्या उपोषणाला ग्रीन प्लानेट संस्थेचा पूर्ण पाठिंबा असून आम्ही जिल्हा आणि शहर प्रशासनाकडे त्यांच्या मागण्या तत्त्वता योग्य असून पूर्ण करण्याची मागणी केली आहे.समर्थनार्थ संस्थेचे प्रा सुरेश चोपणे आणि प्रा योगेश दुधपचारे ह्यानी उपोषण पेंडालला भेट देऊन निवेदन सुपुर्द केले. #News34chandrapur
*मागण्या*-- रामाळा तलाव प्रदुषणमुक्त करून तलावाचे खोलीकरण करणे, खोलीकराणा नंतर तलावाचे सौदर्यीकरण करून पर्यटन विकास करणे.
तलावाच्या दक्षिण दिशेकडील वडाच्या झाडापासुन उदयानात जाण्यास प्रस्तावीत पुलाचे बांधकाम करणे.
रामाळा उदयान निर्मीती वेळेस ‘एक देउळ ते बगड खिडकी’ असा पर्यटनदुष्टया विकसीत केलेल्या रोडचे पुर्ण-बांधकाम करणे,
रामाळा तलाव शहरातील सर्वात मोठे सांडपाणी जमा होण्याचे केेंद्र झाले आहे. तलावात येणारा मच्छीनाल्याचा प्रवााह वळती करणे,
मच्छीनाला जिथे तलावास येउन मिळतो तिथे ‘सिवेज ट्रिटमेंट प्लाॅन्ट’ बसवीनेे.
तलावाच्या दोन्ही बाजुस असलेल्या नागरी वस्तीचे सांडपाणी तलावात येणार नाही याची व्यवस्था करणे.
,तलावाच्या पच्छिम दिशेस अतिक्रमणाची समस्या कायम असुन त्या बाजुस संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे, दरवर्षी होणारे गणेश व दुर्गा मुर्ती विसर्जन तलावात न करणे, लगतच्या रेल्वे मालधक्कावरून रासायनीक खते चढ-उतार होत असल्याने पावसाच्या पाण्यासोबत वाहुन तलावात येत असतात, त्यावर नियत्रंण आणणे,
चंद्रपूर रेलवे स्टेशन ते रामाळा उदयान लगतच्या रेलवे फाटकापर्यतचा रेलवे ट्रॅकला समांतर प्रलंबीत रस्त्याचे बांधकाम पुर्ण करणे, खोलीकरणानंतर वेकोली चे सातत्याने भुगर्भातील सातत्याने फेकण्यात येत असलेले पाणी तलावात आणणे,रामाळा तलावातील प्रदुषणाचे स्त्रोतांचा अभ्यास करून तलावाचे पर्यावरण अबाधित ठेवण्यास संबधीत विभागांना बंधनकारक करणे,रामाळा तलावाच्या तुटलेल्या तलावाच्या भिंतीचे बांधकाम करणे,इ मागण्या त्वरित पूर्ण करण्यात याव्या ह्यासाठी शहरवासीयांनी एकत्र यावे असे आवाहन ग्रीन प्लानेट सोसायटीच्या वतीने करण्यात येत आहे.
