चंद्रपूर - लोककल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था ब्रह्मपुरी द्वारा संचालित स्वामी विवेकानंद मतिमंद मुलांची निवासी शाळेतील संस्थाचालकांचं अनुदानासाठी 25 जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू होत, त्या उपोषणाचा शेवट पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला.
वर्ष 2011 पासून रखडलेल्या संस्थेच्या अनुदानासाठी संस्थाध्यक्ष मंगेश पेटकर व सचिव पुरुषोत्तम चौधरी यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले होते, 1 फेब्रुवारीला आमरण उपोषणाच्या 8व्या दिवशी अर्धनग्न आंदोलन करीत शासनाचं लक्ष वेधले.
जिल्ह्यातील राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री वडेट्टीवार यांची भेट घेत संस्थेच्या समस्येची माहिती दिली.
पालकमंत्री वडेट्टीवार यांनी सदर संस्थेला विशेष बाब म्हणून अनुदानित करू व बुधवारी मुंबईत याबाबत बैठक घेत ठोस निर्णय घेण्याचं आश्वासन दिल्यावर खुद्द पालकमंत्री वडेट्टीवार यांनी उपोषण मंडपात भेट घेत आंदोलन कर्त्याना नारळ पाणी पाजत उपोषण सोडविले.
