चंद्रपूर - चंद्रपूर शहरातील गोंडकालीन ऐतिहासिक वारसा असलेला रामाळा तलाव प्रदूषण मुक्त करून खोलीकरणाच्या मागणीसह अन्य मागणीसाठी २२/०२/२०२१ पासून इको-प्रो संस्था चंद्रपूर यांच्या तर्फे अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनास सुरवात केली आहे मात्र जिल्हा प्रशासन या आंदोलनाकडे लक्ष देत नसल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे शिस्टमंडळ दिनांक २५/०२/२०२१ रोजी या आंदोलनाला भेट घेतली व जाहीर पाठिंबा दर्शवला, व दि.२६/०२/२०२१ ला जिल्हाधिकारी साहेबांना,तसेच पालकमंत्री साहेबांना, आणि आयुक्त साहेबांना निवेदन देण्यात आले व या आंदोलनातील सर्व मागण्या लवकरात लवकर मान्य करून कामाला सुरवात करावी ही मागणी करण्यात आली. #News34
या वेळेस जिल्हाध्यक्ष दिलीप भाऊ रामेडवार, मनविसे जिल्हाध्यक्ष राहुलभाऊ बालमवार,महिला सेना जिल्हाध्यक्ष सौ. सुनिताताई गायकवाड, जिल्हासचिव किशोरभाऊ मडगूळवार,मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, विधानसभा संघटक महेशभाऊ शास्त्रकार,महिला जिल्हासचिव अर्चना आमटे, शहर संघटक मनोज तांबेकर,सुयोग धनवलकर,कृष्णा गुप्ता,प्रविण शेवते,फिरोज शेख,वाणी सदालावार,वर्षा भोमले, शैलेश सदालावार यांची उपस्थिती होती.