राज्यातील एकूण ९ जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढल्याने प्रशासन पुन्हा हाय अलर्टवर आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकणात कडक निर्बंधांचे संकेत देण्यात आले आहेत. रुग्ण वाढल्याने रत्नागिरीतील एक गाव कंन्टेंमेट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे
दरम्यान, हा धोका पुन्हा एकदा वाढू लागला असल्याने सर्वांच्या डोकेदुखीत वाढ होण्याची चिने असताना योगगुरु बाबा रामदेव यांनी कोरोनावर रामबाण उपाय शोधल्याचा दावा केला आहे. #news34chandrapur
बाबा रामदेव यांनी अशी घोषणा केली की पतंजलीच्या कोरोनिल टॅबलेटमुळे कोव्हिडवर उपचार होतील. त्यांनी असा दावा केला आहे की आयुष मंत्रालयाने कोरोनिल टॅबलेटला एक सहाय्यक औषध म्हणून मंजुरी दिली आहे.पतंजलीकडून असा दावा केला जात आहे की 70 टक्के रुग्ण तीन दिवसात या औषधाच्या वापरामुळे बरे होतील.
याआधी रामदेव बाबांनी कोरोनिलला केवळ रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठीचे बुस्टर म्हटले होते. आता रामदेव बाबांनी कोरोनिलला CoPP – WHO GMP च्या प्रोटोकॉल आणि सर्टिफिकेशन सिस्टमनुसार सहाय्यक औषध घोषित केले आहे.
NEWS 34 च्या व्हाट्सअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा..
