चंद्रपूर - राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती स्मारक मंडळाने अनाथ आश्रम येथे अनाथ मुलाना विविध वस्तूचे वाटप करून साजरी करण्यात आली. प्रथम सकाळी ९ वाजता मंडळातर्फे शिव प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यात मंडळाचे मार्गदर्शक व कोषाध्यक्ष_ श्री गजाननजी गावंडे गुरुजी, अध्यक्ष श्री दीपक बेले, श्री दिलीप रिंगणे,श्री निमेष मानकर,श्री चिराग नथवाणी,श्री शैलेश जुमडे,श्री महेश कहिलकर, दिलीप रिंगणे आणि असंख्य शिवभक्त उपस्थित होते. वाटप कार्यक्रम यशस्वी करण्या खालील फर्म नी सहकार्य केले १) रोज चा वापरातील वस्तूची कीट-( हॉटेल रिशा तर्फे),२) टिफीन बॉक्स-( चिराग मार्केटिंग तर्फे),३) सुखा नस्ताचे पॅकेट- (मंडळ),४)प्रत्येक विद्यार्थ्याला गणवेश वाटप -( आराधना ड्रेसेस तर्फे),५) खेळण्याचे समान - (डिलक्स स्पोर्ट्स तर्फे),६) भोजन पट्टी - (पुरन हेंडलुम तर्फे), ७) मेडिकल किट - (सौंस्कार प्लायवूड,श्री आदित्य व्हेल्हे तर्फे),८) किराणा किट - (श्री नीरज तिवारी व श्री पंकज तिवारी तर्फे),९) मास्क वाटप - (श्री नीमेष मानकर) या सर्वांचे मंडळाने आभार मानले.
