चंद्रपूर - केंद्र सरकार दररोज पेट्रोल, गॅस, डीझल दरवाढीवर नियंत्रण करण्यास अपयशी ठरले आहे.
मागील 6 वर्षात जीवनावश्यक वस्तूंचे भाव दुपटीने वाढले असून याचा सर्व आर्थिक भार सामान्य नागरिकांच्या खिशाला सोसावा लागत आहे.
केंद्र सरकारच्या या जनविरोधी धोरणाविरोधात चंद्रपूर युवक कांग्रेसने निषेध आंदोलन करून वाहनाला धक्का मारला व पेट्रोल पंपावरील असलेल्या पंतप्रधान मोदी यांच्या फोटोला काळे फासले. #News34Chandrapur
मोदी सरकार मुर्दाबाद नारे लावत दरवाढीचा युवक कांग्रेसने विरोध केला.
हे आंदोलन महाराष्ट्र युवक कांग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे, प्रदेश महासचिव इर्शाद शेख, शिवानी वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष हरीश कोत्तावार, प्रदेश सचिव सचिन कत्याल, राजेश अडुर, इम्रान खान, राजेश रेवल्लीवार यांनी पार पाडले.
