चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात कमी झालेला कोरोना अचानक वाढायला लागला, रोज 20 च्या वर बाधितांची नोंद जिल्ह्यात होत आहे.
या पार्श्वभूमीवर चंद्रपूर महानगरपालिकेने Sunday Market व तात्पुरत्या स्वरूपात लागणारे दुकान, फेरीवाले यांना दुकान न उघडण्याची विनंती केली असून असे न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सुद्धा पालिका प्रशासनाने दिला आहे. #News34Chandrapur
या निर्णयामुळे आठवड्यातून एकदा आपला व्यवसाय थाटणारे व्यवसायिक यांची आर्थिक परिस्थिती खराब होणार मात्र अचानक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने बाजारातील गर्दी नियंत्रणात आणून नागरिकांच्या आरोग्याच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे पालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
