चंद्रपूर - संस्कार भारती चंद्रपूर द्वारे आयोजित जिल्हास्तरीय भक्तीगीत गायन स्पर्धेत आतशी पॉल हिने 5 हजार रू. चे प्रथम पारितोषीक पटकावत विजेते पदावर मोहोर उमटविली. द्वितीय पुरस्कार मोनाली यादव यांनी तर तृतिय क्रमांक सौ. सोनाली आगडे यांनी पटकाविला. तेजस्विनी घरोटे, अर्थव कौरासे, अनिरूध्द सुरतेकर, संवादिनी चहांदे हे स्पर्धक प्रोत्साहनपर परितोषीकांचे मानकरी ठरले. भारतमाता पुजन उत्सवाचे औचित्य साधुन 7 फेब्रुवारी रोजी स्थानिक श्रमीक पत्रकार भवनात संस्कार भारती द्वारे भक्तीगीत गायन स्पर्धा संपन्न झाली. यात ६२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे पारितोषीक वितरण ज्येष्ठ रंगकर्मी श्री. श्रीपाद प्रभाकर जोशी यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी परिक्षक सौ. विद्याताई पुराणकर, सुरेश मसराम आणि अनिरूध्द देशपांडे संस्कार भारतीचे जिल्हाप्रमुख मंगेश देवूरकर यांची उपस्थिती होती. #News34Chandrapur
प्रास्ताविक अजय धवने यांनी केले. हा उपक्रम संस्कार भारतीचा वार्षिक उपक्रम म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले. प्रमुख पाहुणे श्रीपाद जोशी यांनी गायकांना रियाजावर भर देण्याचे आवाहन केले. रियाजातुन अनेक मोठी गायक मंडळी या देशात भूषण ठरले असल्याचे श्रीपाद जोशी यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी सौ. विद्या पुराणकर, सुरेश मसराम यांनीही स्पर्धकांना मार्गदर्शन केले. स्पर्धेनंतर मंगेश देवूरकर, अॅड. भावना हस्तक, रश्मी हिवरे, अपर्णा घरोटे यांनीही भक्तीगीते सादर केली. स्पर्धेचे संचालन सौ. रोहिणी निले यांनी केले तर पारितोषीक वितरण समारंभाचे संचालन अॅड. क्षमा धर्मपूरीवार यांनी केले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संगीत विधा प्रमुख प्रविण ठगे, डॉ. राम भारत, सौ. संध्या विरमलवार, सुजित अकोटकर, राम कोडमलवार, लिलेश बरदाळकर, सौ. वर्षा चौबे, प्राजक्ता उपरकर आदींनी अथक परिश्रम घेतले.
