चंद्रपूर - जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीवर नियंत्रण ठेवण्याकरिता दिनांक 7 फेब्रुवारीला सकाळी –8.30 वाजता जिल्हा खनिकर्म अधिकारी, खनिज विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय,चंद्रपूर येथील जिल्हा भरारी पथकाने भेट दिली असता मौजा दिंडोरा, प्रकल्प ता. वरोरा वर्धा नदीपात्रामध्ये अवैध रेती/वाळू वाहतूक होत असल्याचे आढळून आले. सदर वाहानाची तपासणी करण्यात येवून विना परवाना रेती वाहतूक करणार्या वाहन ट्रक्टर क्र. एम.एच.34/ 9394, एल.4743, एल.0648, एल.9493, बी. आर.4572, बी.एफ.7268 असे एकूण 06 ट्रक्टर, पोकलँड मशीन एक, हायवा क्र. MH-13-JB-1690 व हाफटन ट्रक एम.एच.34 एफ 1549 जप्त करून श्रीमती वर्षा गिरीधर मसारकर, पोलीस पाटील मौजा दिंडोरा, ता. वरोरा यांचे कडे सुपूर्दनाम्यावर सुपूर्द करण्यात आलेले आहे. उक्त वाहानावर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता -1966 च्या कलम 48 च्या पोट कलम (7) (8) च्या तरतुदीन्वये पुढील दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल असे अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी कळविले आहे.
