चंद्रपूर - केंद्र सरकार सतत पेट्रोल व डीझल दरवाढ करीत असल्याने सामान्य नागरिकांचे हाल होत असून शिवसेनेने राज्यभर केंद्र सरकारविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
चंद्रपूर जिल्हा शिवसेना 5 फेब्रुवारीला जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या नेतृत्वात आंदोलन होणार आहे.
सकाळी 11 वाजता जटपुरा गेट समोरून आंदोलनाला सुरुवात होत असून जिल्हाधिकारी कार्यालयजवळ आंदोलनाची सांगता होणार आहे.
पेट्रोल, डीझल दरवाढीने त्रस्त जनता आता गॅस दरवाढीने सुद्धा बेहाल झाले आहे, केंद्र सरकारचा निषेध म्हणून शिवसेना संपूर्ण राज्यात आंदोलन करणार असून चंद्रपूर शहरात होणाऱ्या आंदोलनात जिल्ह्यातील पदाधिकारी, शिवसैनिकांनी मोठ्या संख्येत आंदोलनात उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी केले आहे.