चंद्रपूर - मोहर्ली येथील मुधोली बिट अंतर्गत एका शेतात 3 वर्षीय नर वाघाचा मृतदेह आढळला.
मृतक वाघाच्या शरीरावर अनेक जखमा आढळल्या असून शव विच्छेदन झाल्यावर वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकेल अशी माहिती वनविभागाने दिली आहे.
सदर मृतदेह बफर क्षेत्रात मिळाला असून वाघाचा मृत्यू 2 वाघांच्या झुंजीत झाला असावा असा अंदाज वर्तविल्या जात आहे.
