प्रतिनिधी/विक्की गुप्ता
घुगूस - शहरातील अभियंता शुभम फुटाणे अपहरण व हत्याकांड प्रकरणातील आरोपी गणेश पिंपळशेंडे ला न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी 20 फेब्रुवारी पर्यंत सुनावली आहे. #News34Chandrapur
शुभम फुटाणे या युवकाचा मृतदेह 28 दिवसानी पोलिसांना मिळाला, अपहरण नंतर म्हणजे 17 जानेवारीला शुभमची हत्या करण्यात आली होती.
हत्येचा आरोपी गणेश याने गुन्ह्याची कबुली तर दिली पण अजूनही पोलिसांना पुरावे मिळाले नसल्याने गणेशची कोठडी पुन्हा मागण्यात आली होती.
