वरोरा - दि. 10/02/21 रोजी पो स्टे वरोरा हद्दीतील नंदोरी रोडने पेट्रोलिंग करीत असता माहिती मिळाली की एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ क्र MH 34 AA 5716 मध्ये देशी दारूचा माल चंद्रपूर येथे जात आहे. या महितीच्या आधारे नंदोरी गावाजवळील हायवे रोडवर नाकाबंदी करून माहितीच्या आधारे स्कॉर्पिओ क्र MH34 AA 5716 ची झडती घेतली असता त्यात 90 मिली ने भरलेल्या 16 देशी दारूच्या पेट्या (1600 निपा ) कि 1,60,000 रु. व वाहन की 10,00,000 रु असा एकूण 11,60,000 रु चा मुद्देमाल आरोपी 1) सुरेंद्र श्यामराव धाबेकर वय 30 वर्ष रा. चरूर खटी ह.मु. चंद्रपूर ,2) रवींद्र कवडुजी घटे वय 25 वर्ष रा. माढेळी यांचे ताब्यात मिळून आल्याने गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आली आहे. #News34Chandrapur
सदरची कारवाही मा. श्री. अरविंद साळवे पोलीस अधीक्षक चंद्रपूर, मा. श्री प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, मा. श्री. निलेश पांडे , उप विभागीय पोलीस अधिकारी वरोरा, यांचे मार्गदर्शनात मा. पोलीस निरीक्षक दिपक खोब्रागडे पो. स्टे. वरोरा यांचे अधिपत्यात पोउपनी सर्वेश बेलसरे, सफो विलास बलकी, पोहवा राजेश वऱ्हाडे, रणधीर मेश्राम, नापोशी किशोर बोढे, दिलीप सुर, पोशी कपिल भांडारवार, पोशी सुरज मेश्राम, पोशी विशाल गीमेकर, पोशी दिनेश मेश्राम, पोशी महेश बोलगोडवार यांनी पार पाडली.
