गडचांदूर/सै.मूम्ताज़ अली:-
गडचांदूर येथील प्रभाग क्रमांक १ मधील नगरपरिषद हद्दीतील ओपन स्पेस याठिकाणी व्यायाम शाळेची निर्मिती करावी यासाठी येथील युवकांनी नगरपरिषद उपाध्यक्ष तथा राकाँ कोरपना तालुकाध्यक्ष शरद जोगी यांना साकडे घातले असून यासंबंधी भेट घेऊन जोगी यांना निवेदन देण्यात आले आहे.यावेळी प्रवीण मेश्राम,हरीश भगत,सतीष भोजेकर,रूपेश मेश्राम, आफताब पठाण,अरबाज़ शेख,केतन पोटे,सूरज कांबळे,प्रफुल मेश्राम,सूरज भोजेकर,विनोद वाघाडे,प्रणल भोगेकर, महेश चुन्ने,संजय कांबळेंसह इतर युवकांची मोठ्यासंख्यने उपस्थिती होती.
गडचांदूर शहराची लोकसंख्या लक्षात घेता इतर शहराप्रमाणे याठिकाणी सुद्धा"ओपन जिम" ची निर्मिती होणे अत्यंत गरजेचे,अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.स्थानिक नगरपरिषदेने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
