चंद्रपूर - लखमापूर क्षेत्रातील मानाच्या हनुमान मंदिरात अज्ञात चोरट्यानी दानपेटीच उडविल्याची घटना उघडकीस आली असून हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.
लखमापूर हनुमान मंदिर परिसराची देखरेख करणारे सुरेश शर्मा यांना मंदिरातील पुजारी राम तिवारी यांनी फोनवरून मंदिरात चोरी झाली अशी सूचना केली. (The thief stole the donation box from the temple)
शर्मा तात्काळ मंदिरात पोहचले असता त्यांनी सीसीटीव्ही तपासून बघितले असता त्यामध्ये 5 जानेवारीला सकाळी 4 वाजताच्या सुमारास 22 ते 25 वर्षीय वयोगटातील युवक हा दानपेटी घेऊन जात असल्याचे दिसताच त्यांनी याची तक्रार रामनगर पोलीस स्टेशनला दिली.
सदर दानपेटीत एकूण 20 ते 25 हजारांची रक्कम त्या अज्ञात चोरट्याने लंपास केली असल्याचा अंदाज असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.
