चंद्रपूर - साहित्यिक,सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या ऊर्जानगर चंद्रपूर (जि.चंद्रपूर)येथील कवी मधुकर श्रावण दुफारे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे,विदर्भ विभागीय अध्यक्ष आनंदकुमार शेंडे यांचे निर्देशानुसार नागपूर विभागीय अध्यक्ष कवी सतीश सोमकुवर आणि नागपूर विभागीय सरचिटणीस जयेंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष नीरज आत्राम चंद्रपूर यांनी चंद्रपूर शहर (जि.चंद्रपूर)अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
कवी मधुकर श्रावण दुफारे यांनी साहित्य क्षेत्रातील वंचित,तडागाडातील कवी,लेखक,साहित्यिक यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या आणि आपल्या कार्याच्या माध्यमातून एक विचारपीठ उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन साहित्य क्षेत्रातील कवी,कलावंत यांना दिले आहे.
त्यांच्या नियुक्तीबद्दल राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे,राष्ट्रीय उपाध्यक्ष राजकुमार काळभोर ,विदर्भ विभागीय अध्यक्ष आनंदकुमार शेंडे,विदर्भ विभागीय सचिव प्रा.मिलिंद रंगारी,नागपूर विभागीय अध्यक्ष सतीश सोमकुवर,नागपूर विभागीय सरचिटणीस जयेंद्र चव्हाण,नागपूर विभागीय सदस्या कवयित्री सरिता रामटेके,चंद्रपूर जिल्हाध्यक्ष नीरज आत्राम,कवी सुनील बावणे, कवी प्रकाश पिंपळकर, कवी महेंद्र मंडपे, कवी गजानन माद्यसवार कवी संतोष उईके, कवीप्रवीण आडेकर, कवी नरेंद्र कन्नाके(नीरजकार), कवी परमानंद तिराणिक, अतुल येरगुडे, सौ.भारती लखमापुरे, सौ. मंजुषा दरवडे अरुण आगलावे कवी विशाल मोहूर्ले, कवयित्री सोनाली रायपुरे(सहारे), किशोर चलाख,दुशांत निमकर,महेश भामरे, संतोष मेश्राम,विलास उगे,मुरलीधर गोहणे,शंकर दरेकर,देवराव कोंडेकर,नानाजी बावणे आदींनी अभिनंदन करून भावी कार्यासाठी शुभेच्छा प्रदान केल्या आहेत.
