चंद्रपूर - हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त शिवसेना जिल्हा चंद्रपूर तर्फे दि. २३/०१/२०२१ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांच्या कुटूंबियांना आर्थिक सहाय्य करण्यात आले. Shivsena Chandrapur
चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा तालुक्यातील
१) शंकर वारलू बोरकुटे वय ४१ वर्षे रा. पाचगाव
२) प्रभाकर बापूजी वैद्य वय ३३ रा. पांढरपौवणी
या दोन्ही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती ही बातमी चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना कळताच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून आणि मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणी अनुसार तसेच ८० % समाजकारण व २० % राजकारण या धोरणानुसार या दोन्ही कुटूंबियांना प्रत्यक्ष भेट देत शिवसेना पदाधिकाऱ्यांतर्फे प्रत्येक कुटुंबाला १०,००० रूपये आर्थिक सहाय्य करत त्यांच्या दु:खात सहभागी झाले. News34 Chandrapur
यावेळी सतिश भिवगडे (मा.जिल्हाप्रमुख) जयदिप रोडे (भा.का.से.जिल्हाध्यक्ष) मनोज पाल (मा.शहरप्रमुख) शालिक फाले (मा.तालुकाप्रमुख,पं.स. सदस्य) राजेश नायडू (शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष) सौ विजया रोगे(जिल्हा संघटिका महिला आघाडी) पप्पू बोपचे, पंकजसिंग दिक्षित, रिझवान पठाण,संजय शहा तसेच इतर पदाधिकारी व शिवसैनिक तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.
