प्रतिनिधी/विक्की गुप्ता
घुगूस - शहरात मागील अनेक वर्षांपासून वाळू माफिया वाळूची तस्करी करून शासनाला कोट्यवधी रुपये महसुलाचा चुना लावत आहे.
नायगाव (हल्ला) घाटावर तर वाळू तस्करांची महफिलच भरते नंतर तब्बल 40 ते 50 ट्रॅक्टर रोज रात्री व दिवसा वाळूचा उपसा करतात ते सुद्धा प्रशासनाच्या नाकाखाली, प्रशासन कारवाई करते पण नंतर परिस्थिती जैसे थे.
नायगाव घाटावर प्रशासनाने वाळू तस्करांना थांबविण्यासाठी घाटावर जाणार रस्ता खोदून टाकला मात्र म्हणतात न शेरास सव्वाशेर, वाळू तस्करांनी बंद असलेल्या GOC खाणीजवळून नवा रस्ता निर्माण केला. The sand mafia in Ghugus
काही महिन्यांपूर्वी महसूल विभागाने घुगूस पोलीस स्टेशनच्यासमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले मात्र हे सर्व कॅमेरे शो पीस बनले आहे.
वाळू तस्कर कॅमेऱ्याला हात दाखवीत त्या मार्गावरून रेती तस्करी करीत आहे.
प्रशासनाच्या कारवाईच्या दिरंगाई मुळे वाळू तस्करांना मोठं बळ मिळत आहे.
