घुगूस - मागील अनेक वर्षांपासून नायगाव येथील हल्ल्या घाटावर वाळू तस्करी जोमात सुरू होती.
वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी महसूल विभागाने घुगूस पोलीस स्टेशनसमोर सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा लावले मात्र ते कॅमेरे शो पीस राहून गेले. News34 News Impact
विशेष म्हणजे या वाळू तस्करीची संपूर्ण माहिती तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना होती मात्र कारवाई का होत नाही यावर अनेक चर्चाना उधाण आले होते.
वाळू तस्कर व प्रशासनात साटेलोटे आहे म्हणून तस्करांवर कारवाई होत नाही.
या वाळू तस्करीबाबत जिल्ह्यातील डिजिटल व्यासपीठ News34 ने बातमी प्रकाशित केली त्या बातमीची दखल प्रशासनाने घेत रेती तस्करांवर कारवाई केली. News34 chandrapur
सर्वात महत्वाची बाब म्हणजे खुद्द चंद्रपूर दंडाधिकारी रोहन घुगे यांनी आज पहाटे 5 वाजता एका तलाठ्यासह स्वतः दुचाकी वाहनांवर नायगाव येथील हल्ला घाट गाठून वाळू तस्करांवर कारवाई करीत एकूण 24 ट्रॅक्टर जप्त केल्या.
जप्त केलेले सर्व वाहन घुगूस येथील तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.
स्वतः उपविभागीय अधिकारी यांनी भल्या पहाटे अवैध वाळू तस्करांवर कारवाई करीत आपल्या कर्तव्य दक्षतेचे उदाहरण दाखवून दिले आहे.
काही दिवसांपूर्वी सुद्धा वाळू तस्करांवर अश्याच प्रकारे कारवाई करण्यात आली होती त्या करवाईमधील जप्त करण्यात आलेले ट्रॅक्टर आजच्या कारवाईचे जप्त करण्यात आले.
कर्तव्यात कसूर करणाऱ्या घुगूस येथील स्थानिक कर्मचाऱ्यांवर महसूल प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
