नागपूर - महाराष्ट्र राज्यात 12 हजार पोलिसांच्या जागा भरण्याची प्रक्रिया मागील तीन वर्षापासून प्रलंबित आहे. वेळोवेळी राज्य सरकारने पोलीस भरती सुरू करणार अशा प्रकारची घोषणा केली व कोणत्या ना कोणत्या कारनाणे प्रत्येक वेळेस स्थगिती देण्यात आली. म्हणजे राज्य सरकार पोलीस भरती प्रक्रिया वर गंभीर दिसत नाही आहे.
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर सुद्धा पोलीस दलात महाभरती होणार अशा प्रकारची फोल घोषणा करण्यात आली परंतु सरकार स्थापन होऊन सव्वा वर्ष लोटून गेले परंतु आजपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नाही. राज्याच्या वाढत्या भौगोलिक परिस्थिती मुळे पोलीस बल अपूर्ण पडत आहे त्यामुळे गुनेगारीत वाढ होऊ शकतो यात तिळमात्र शंका नाही अशी भीती समाजापुढे उत्पन्न होत आहे. (National OBC Federation)
पुरोगामी महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे व पोलीस विभागात लाखो जागा रिक्त असताना पद भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात येत नसल्यामुळे अनेक पात्र विद्यार्थ्यांचा वयात वाढ होत असल्यामुळे सरकारच्या या दिरंगाईमुळे समाजातील अनेक विद्यार्थी मिळणार असलेल्या रोजगाराच्या संधीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्या करिता व पोलीस दलातील १२ हजार जागांची प्रक्रिया त्वरित सुरू करण्याकरिता राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे 11 जानेवारी 2019 रोजी सकाळी ९.३० वाजता मा. ना. श्री. अनील देशमुख यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे व पदवीधर मतदार संघाचे आमदार एडवोकेट अभिजित वंजारी प्रमुखाने उपस्थित राहणार आहे.
या घंटानाद आंदोलनात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सर्व पदाधिकारी संलग्नित संघटनेचे पदाधिकारी जातीय संघटनेचे पदाधिकारी सदस्य हितचिंतक व पोलिस दलातील नोकरी करिता जाणास इच्छुक विद्यार्थी युवक युवतींनी सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, समन्वयक डॉक्टर अशोक जिवतोडे, राजकिय समन्वयक डॉक्टर खुशाल चंद्र बोपचे, शरद वानखेडे, ईश्वर ढोले, सुरेंद्र मोरे, त्रिशरण सहारे, संजय पन्नासे, राजेश रहाटे, दिलीप भोयार, दिलीप गोमासे, गणेश नाखले, उदय देशमुख, निलेश कोढे, विनोद हजारे, शुभम वाघमारे, सुषमा भड, कल्पना मानकर, वृंदा ठाकरे, ऋषाब राऊत, वीणा बेलगे, नंदा देशमुख, रुतिका डाफ, वेदांत्ती झाडे, काजल कडूकर, श्वेता पंन्नासे, नंदकिशोर राऊत, निशिकांत चौधरी व आदींनी केले आहे.
