चंद्रपूर - शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या प्रेरणेने, युवासेना कार्यकारिणी सदस्य रूपेशजी कदम, जिल्हा विस्तारक त्रिपाठीजी, शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिर्हे यांच्या मार्गदर्शनात हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्य शनिवार दि. २३ जानेवारी २०२१ रोजी चंद्रपूर जिल्हा युवासेनेतर्फे अँस्पायर प्रोफेशनल अकँडमी, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) चे मोफत प्रशिक्षण वर्ग दि. ०१ फेब्रुवारी २०२१ पासून सुरू करण्यात येत आहे. जिल्ह्यातील विद्यार्थी मोठ्या प्रशासकीय पदावर पोहोचून देशात विकासाकरिता त्यांनी जिल्हातून नेत्रुत्व करून चंद्रपुरचे नावलौकिक करावे, कुणीही पैशाअभावी गरीबीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने सामाजिक कर्तव्य समजुन युवासेना शिवसेना च्या वतीने हि संधी उपलब्ध करून देण्यात आले आहे. Free Mpsc Classes shivsena, yuvasena chandrapur
त्या निमित्य गरजू व होतकरू ध्येय प्रेमी विद्यार्थ्यांनी दि. ३१ जानेवारी २०२१ पर्यंत खालील क्रमांकावर 8830136419, 9834196922 संपर्क साधून नोंदनी निश्चित करावी व या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन आपली स्वप्नपुर्तता करावी असे आव्हान युवासेना जिल्हाप्रमुख इंजि. निलेश बेलखेडे यांनी विद्यार्थ्यांना केलेले आहे. News34 chandrapur
