चंद्रपूर - शहरातील औद्योगिक विकास क्षेत्रात Mother Dairy दूध प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले आहे मात्र याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाची कसलीही परवानगी घेण्यात आली नसून अवैध पध्दतीने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.
या Mother Dairy दुधाच्या चिलिंग प्लांट मधून निघणारे दूध बाजारात विकल्या जात असून त्याचे दुष्परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर काय होत असेल याची कुणालाही कल्पना नाही.
सदर दूध केंद्र हे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अटी शर्तीचे पालन केल्यावर सुरू करण्यात येते मात्र हे केंद्र सर्वात जास्त प्रदूषित असलेल्या क्षेत्रात सुरू करण्यात आले ते सुद्धा परवानगी न घेता.
याबाबत चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला निवेदन देत सदर केंद्र हे प्रदूषित कसे काय उभारण्यात आले असा प्रश्न उपस्थित केला.
गिर्हे यांच्या निवेदनानंतर प्रदूषण नियंत्रण विभाग खळबळून जागे झाले.
13 जानेवारीला त्यांनी प्रदूषण अधिकारी यांची टीम दूध प्रक्रिया केंद्रात चौकशीसाठी पाठवली त्या चौकशीत चिलिंग प्लांटला चालविण्यासाठी परवानगी नव्हती, जल प्रदूषण व वायू प्रदूषण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे, वेस्ट मटेरिअल ची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी कसलीही व्यवस्था केली नसल्याचे निष्पन्न झाले असून तात्काळ प्रदूषण नियंत्रण मंडळाने Mother Dairy दूध प्रक्रिया केंद्र चालविणाऱ्याला संबंधित विभागाच्या परवानगी शिवाय व अटी शर्तीचे उल्लंघन केल्याने तुमच्यावर कारवाई का करू नये असे शो कास नोटीस जारी करीत 15 दिवसांच्या आत उत्तर मागितले आहे. Mother Dairy chilling plant chandrapur in polluted area
शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या जागरूकतेमुळे आज प्रदूषित जागेवर असल्या प्रकारचे दूध प्रक्रिया केंद्र असल्याचे उघडकीस आले. News34 Chandrapur
दूध हे दैनदिन जीवनात आवश्यक असून हे प्रदूषित दूध जिल्ह्यात अनेक ठिकाणी वितरित झाले या प्रदूषित दुधाचा नागरिकांच्या आरोग्यावर काय परिणाम होत झाला असेल? हे तर सांगणे कठीण आहे, हे केंद्र चालविणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा गिर्हे यांनी केली आहे.
