चंद्रपूर - दिनांक ०५/०१/२०२१ ला सायंकाळी ०७ वाजता हॉटेल ट्रायस्टार, नागपूर रोड, चंद्रपूर येथे जे सी आय चंद्रपूर ईलाइट संस्था तर्फे जे सी आय चंद्रपूर ईलाइट संस्थेचे वर्ष २०२०-२१ चे १२ वे पदग्रहण समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या पदग्रहण समारंभ मधे वर्ष २०२०-२१ साठी जे सी आय चंद्रपूर ईलाइट संस्था तर्फे अध्यक्ष साठी आर्क आनंद मुंधडा आणि सचिव स्थानी अनुप काबरा यांची निवड करण्यात आली आहे. जे सी आय चंद्रपूर ईलाइट संस्थेचे वर्ष २०१९-२० चे पूर्व अध्यक्ष सी ए प्रतीक सारडा आणि सचिव रुपेश राठी हे निवृत्त झाले आणि वर्ष २०२०-२१ साठी नवीन कार्यकारणी समितीची स्थापना करण्यात आली. या कार्यक्रमात पूर्व अध्यक्ष सी ए प्रतीक सारडा तर्फे वर्ष २०१९-२० मधे चंद्रपूर मधे संपन्न झालेल्या वार्षिक घडामोडी बद्दल वार्षिक अहवाल प्रस्तुत करण्यात आले व त्यानंतर औपचारिक प्रक्रिया नंतर नवीन कार्यकारणीची स्थापना करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहीते होते आणि प्रमुख उपस्थिती जे सी आय प्रभाग १३ झोन ई के उपाध्यक्ष शिवराज टेकाडे यांची होती. या कार्यक्रमात जे सी आय संस्थेचे माजी अध्यक्ष, माजी सचिव, वरिष्ठ कार्यकारणी आणि सर्व सदस्य गण उपस्थित होते. JCI CHANDRAPUR ELITE
चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्य राजेश मोहीते यांनी सभेला संबोधित करताना म्हटले कि, चंद्रपूरच्या नागरिकांसाठी जे सी आय संस्था आणि चंद्रपूर म.न.पा. मिळून अनेक सकारात्मक प्रकल्प घेऊ शकतात. जल संवर्धन, जैविक खत, वृक्षारोपण सारखे अनेक प्रकल्प जे सी आय संस्था घेऊ शकते. जे सी आय संस्थेत युवा आणि युवतींची संस्था खूप आहे व त्यामुळे चंद्रपूर शहर स्वच्छ ठेवण्यात आणि चंद्रपूर मध्ये घेण्यात येणाऱ्या स्वच्छता संबंधी प्रकल्पात जे सी आय च्या सदस्यांनी सहकार्य करावे असे म्हणून त्यांनी नवनिर्वाचित समितीला त्यांनी आपल्या शुभेच्छा दिल्या. श्री मेघनाथ जानी यांनी आपल्या उद्बोधन मधे अशे म्हटले कि, संपूर्ण शाखेत जेसीआई चंद्रपुर ईलीट फारच प्रशंसनीय कार्य केले असून, नागरिकांमध्ये हि आशा जागविली आहे कि, भविष्यातही या अध्यायातून एखादी सदस्य राष्ट्रीय स्तरावर पोहचून जे सी आय भारतचे राष्ट्रीय अध्यक्ष बनेल. NEWS34 CHANDRAPUR
जे सी आय शाखा १३ चे अध्यक्ष श्री अनूप गाँधी यांनी येणाऱ्या वर्षाची रूपरेखा उपस्थित सदस्यांसमोर ठेवली आणि भविष्यात त्यांच्या मार्गदर्शनात घेण्यात येणाऱ्या प्रकल्पांची माहिती दिली. जे सी आय प्रभाग १३ झोन ई के उपाध्यक्ष शिवराज टेकाडे यांनी आपले विचार व्यक्त करताना अशे म्हटले कि जे सी आय ईलाइट संस्था हि त्यांच्या निरनिराळ्या प्रकल्प संबंधी आणि जागरूक सदस्यांना साठी पूर्ण विभागात प्रसिद्ध आहे. मागील तीन वर्षात जे सी आय चंद्रपूर ईलिटने दोन विभाग अध्यक्ष संस्थेला दिले आहेत त्यांच्या उचित मार्गदर्शन मध्ये संस्था हि निश्चितच चांगले प्रकल्प घेतील असा विश्वास टेकाडे यांनी दाखविला.
जे सी आय चंद्रपूर ईलाइट संस्था हि मागील १२ वर्षांपायासून नियमितपणे युवांसाठी आणि युवतींसाठी अनेक शैक्षणिक, सामाजिक आणि वक्तृत्व विकास संबंधी प्रशिक्षण शिबीर घेत असते. या कार्यक्रमात चंद्रपूरच्या अनेक युवांची जे सी आय ईलाइट संस्थेत अधिकृत नोंदणी करण्यात आली आणि त्या सर्व नवीन सदस्यांचे शपथग्रहण करण्यात आले. पूर्व वर्षी ज्या सदस्यांनी छान प्रदर्शन केले त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रकल्प संचालन आशिष पोद्दार, स्नेहल काबरा आणि मयुरी पोद्दार यांनी केले. या कार्यक्रमात विशेष उपस्थिती पूर्व जे सी आय अध्यक्ष सी ए दामोदर सारडा, डॉ.सुशील मुंधडा, श्याम धोपटे, उमेश चांडक, पूर्व झोनल अध्यक्ष भारत बजाज, मेघनाद जानी यांची होती. या कार्यक्रमाच्या सफल श्रेयस सुराणा, रूपेश राठी, गौरव लाहोटी, पार्थ कांचर्लावार, ज्ञानेश कांचर्लावार, सुशांत नक्शिने, ऋषिकांत जाखोटिया, बिपीन भट्टड, डॉ.आशिष गजबे, सी ए पंकज मुंद्रा, नितेश चांडक, अभिलाष बुक्कावार, अश्विन सारडा, पंकज सारडा, पियुश् माहेश्वरी, राहुल जैन, योगेश तोष्णीवाल, राजेश नायर, अक्षय जानवे, एड.आशिष मुंधडा व इतर सदस्यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाच्या सफल आयोजन साठी आणि सन्माननीय अतिथी कार्यक्रमात उपस्थित असल्याबद्दल अनुप काबरा यांनी आभार प्रदर्शन केले.
