नागपूर - पक्षाने मला आदेश द्यावा मी पुढची लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लढायला तयार आहे, मागच्या लोकसभा निवडणुकीत मला तयारी करायला फक्त 15 दिवस मिळाले होते तरीसुद्धा केंद्रीय गृहराज्यमंत्री अहिर यांचा पराभव केला. अशी हुंकार आज नागपूर येथे कांग्रेस पक्षातर्फे राजभवनाला घेण्यात आलेल्या घेराव कार्यक्रमात हे वक्तव्य राज्यातील एकमेव कांग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी केले. Congress Mp Balu Dhanorkar Challenge PM Modi
चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेनेतून धानोरकर सुरू झालेला आमदारकीचा प्रवास कांग्रेस पक्षात प्रवेश करीत लोकसभेत आला, देशात मोदी लहर असताना राज्यात सर्व जागी कांग्रेस तोंडावर पडली मात्र चंद्रपूर जिल्ह्यात त्यांनी कांग्रेसचा पताका फडकवीत राज्यातून एकमेव कांग्रेस खासदार म्हणून धानोरकर लोकसभेत पोहचले. News34 Chandrapur
आता थेट पंतप्रधान मोदी यांना आवाहन देत त्यांच्या वाराणसी मतदार संघातून उभे राहण्याची तयारी धानोरकर यांनी दर्शविली. त्यांच्या वक्तव्याला पक्षश्रेष्ठीं मान देणार का? हे महत्वाचे ठरणार.
