नागपूर/गडचिरोली - राज्यात कोरोनानंतर आता बर्ड फ्लूने थैमान घातले असून अनेक कोंबड्यांना मारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
नागपूर जिल्ह्यातील वारंगा या गावातील 23 कोंबड्यांचे नमुने बर्ड फ्लूने पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली असून आता गावातील 460 कोंबड्या ठार मारण्याचा निर्णय पशुसंवर्धन विभागाने घेतला आहे. Bird flu
वारंगा गावात 23 कोंबड्या अचानक मृत पावल्या होत्या त्यांचे नमुने 14 जानेवारीला प्रयोगशाळेत तपासणी साठी पाठविले होते, सोमवारी त्यांचा अहवाल बर्ड फ्लूने पॉझिटिव्ह आला व प्रशासनाने कोंबड्या मारण्याचा निर्णय घेतला. News34 Chandrapur
जिल्ह्याधिकारी यांच्या परवानगीने गावातील 1 किलोमीटर अंतरावरील कोंबड्या मारण्याची कारवाई सुरू केली. त्याचप्रमाणे गडचिरोली शहरातील 15 कोंबड्यांचे नमुने पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाने 1 किलोमीटर अंतरावरील कोंबड्या मारण्याचा निर्णय घेतला आहे.
