चंद्रपूर - लालपेठ येथील तेलगु भाषिक नागरिकांचे वास्तव्य लक्षात घेता येथे तेलगू समाजाचे भवण बांधण्यात यावे अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक कलाकार मल्लारप यांनी आ. किशोर जोरगेवार यांना केली आहे. चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आहे. त्यामूळे रोजगाराच्या शोधात चंद्रपुरात येवून स्थायी झाले आहे. यात वेकोली क्षेत्रात काम करणा-या तेलुग भाषीकांची संख्या अधिक आहे. लालपेठ, महाकाली कॉलरी, नांदगाव या भागात यांची संख्या लक्षणीय आहे. असे असले तरी या भागात एकही तेलगु समाज भवण नाही. त्यामुळे सामाजिक कींवा, घरगुती कार्यक्रम करण्याकरीता येथील नागरिकांना अडचण निर्माण होत आहे. हि बाब लक्षात घेता लालपेठ येथे तेलगू समाज भवणाची निर्मीती करण्यात यावी अशी मागणी यंग चांदा बिग्रेडचे शहर संघटक कलाकार मल्लारप यांनी केली असून सदर मागणीचे निवेदनही त्यांच्या वतीने आ. किशोर जोरगेवार यांना देण्यात आले आहे. आ. जोरगेवार यांनी यावेळी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या प्रसंगी कलाकार मल्लारप, आदी गिरवेनी, वेंकटेश सूरा, रमेश पारनंदी, रमेश जोरिगल, सत्यम महेश्वर, अमीत कोरकोपुलवार, वेनू कोडेल, संपत कडम, सिनु कोडारी आदिंची उपस्थिती होती.
