गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
गाव तिथे शाळा हे धोरण अवलंबत शासनाने गावागावात शाळा सुरू केली. मात्र आजही पाहीजे त्याप्रमाणात काम झालेले दिसत नाही.शाळेत शौचालयांचा वापर असावा,मुलांना चांगल्या सवयी लागाव्यत,आरोग्य उत्तम रहावे यासाठी उप्परवाही येथील अंबुजा फाऊंडेशनतर्फे राजूरा, कोरपना, जिवती तालुक्यात गावाऱ्यांच्या पुढाकाराने मुला,मुलींसाठी सुसज्ज शौचालय,हात धुण्यासाठी हैंडवॉश स्टेशनची निर्मिती केली.
शाळेच्या इमारती आहे पण त्या सुशोभित नसल्यामुळे शाळा आनंददाई दिसत नव्हत्या यामुळे मुलांच्या शिकवणीवर परिणाम जाणवतो.परिणामी मुले नियमित शाळेत येत नाही.
मुलांना शाळेत रमणीय वातावरण मिळावे या उदात्त हेतूने अंबुजा फाउंडेशनने शाळेच्या भिंती बोलक्या करायच्या ठरवले.हे करतांना गावकरी व सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोणातून आवडतील तसे चित्र भिंतीवर रेखाटण्यात आले.त्यात सामाजिक संदेश, स्वच्छता,पर्यावरण,गणीत,विज्ञान,भाषा संकृती याचा भरपूर वापर केला गेला. शिक्षकांनी प्रार्थनेच्या वेळी व इतर वेळात ते वाचायला लावत आहे आणि त्यावर आधारित प्रश्न विचारत असल्याने याचा मुलांच्या शिक्षणावर मोठा फायदा होत असल्याचे पहायला मिळत आहे.शाळांचे बदललेले स्वरूप पाहून लोकांचा सहभाग ही वाढला,शाळेचे उत्तरदायित्व लोकांनी स्विकारले, लोक आता शाळा अधिक सुंदर करायला लागले असून स्थानिक नागरिक व समिती शाळेकडे अधिक लक्ष द्यायला लागली.
या बोलक्या भिंतींचा सकारात्मक परिणाम म्हणजे मुलांच्या गुणवत्तेत देखील सुधारणा होत असल्याचे चित्र आहे.अंबुजा फाऊंडेशनच्या मार्गदर्शनाने जिवती,कोरपना व राजूरा या तालुक्याच्या ठिकाणी जवळपास सर्वच शाळा ISO झाल्याचे चित्र असून आजही उर्वरीत शाळेच्या भिंती बोलक्या करायचे काम थांबले नसून मागील वर्षात 30 शाळा आणि पुढेही अनेक शाळेत हे काम सुरूच राहाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.भिंतीवर चित्र,लिखाण याद्वारे मुलांना शिकता येईल अशी शाळा तयार करणे. आदिवासी बहुल भागात बरीच भाषेची समस्या आहे. मराठी बोलताना मुलांचे उच्चार स्पष्ट नसणे,बाराखडी तसेच इंग्रजी यासारखे विषय या वॉलपेंटिंग मधून शिकण्यास मदत होत आहे.
------------//-----------
सदर उपक्रमामुळे मुलांना शाळेत येण्याचे आकर्षण वाढत आहे.मुलांची गुणवत्ता ही चांगली होत आहे.त्या बोलक्या भिंतींमुळे भाषेतील लवचिकता व शब्दांचे अर्थ समजण्यास सोपे जात आहे.
"संगीता मुलकलवार"
अंबुजा फाउंडेशन उपरवाही.
--------------//-----------
