नागपूर - कोरोना काळात राज्यात संसर्ग वाढू नये यासाठी शाळा बंद करण्यात आला, कोरोनाचा प्रकोप कमी होत असताना शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले मात्र शाळेची फी न भरल्यास ऑनलाईन शिक्षण बंद करण्यात आले आहे.
अश्या अनेक तक्रारी राज्य शासनाला प्राप्त झाल्या असून यावर शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी रोखठोक मत मांडत ज्या शाळा ऑनलाईन शिक्षण बंद करणार त्या शाळेवर दंडात्मक कारवाई करणार असा इशारा दिला.
ज्या शाळांनी अतिरिक्त शुल्क वसूल केले आहे त्या शासनाच्या रडारवर असून त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार आहे, ज्या शाळा चांगलं शिक्षण देत आहे त्यांना शासन सुद्धा सहकार्य करेलच मात्र शिक्षणाच्या नावावर व्यवसाय करणारे कारवाईपासून वाचणार नाही.
नागपुरातील नारायणा विद्यालयम शाळेवर अतिरिक्त शुल्क वसुली प्रकरणी कारवाई करण्यात आली असून वसूल करण्यात आलेले 7 कोटी 59 लाखांचे शुल्क पालकांना परत करण्याचे निर्देश दिले आहे जर त्यांनी ती रक्कम परत केली नाही तर शाळेवर जप्तीची कारवाई करण्यास मागेपुढे बघणार नसल्याचे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.
