चंद्रपूर - कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात त्यामुळे कौटुंबिक गरजा भागविणे जिकिरीचे होत असून अशा कठीण प्रसंगी घरातील मुलगी वा गृहिणीनी व्यावसायिक कौशल्य शिक्षण घेऊन घर सांभाळण्यासाठी पुढे यावे ह्यासाठी रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरच्या वतीने ब्युटीपार्लर अभ्यासक्रमाचे आयोजन निशुल्क केले असून महिलांना आत्मनिर्भरता व स्वयं रोजगारासाठी व्यावसायिक प्रशिक्षण घेणे काळाची गरज असल्याचे प्राचार्या स्मिता ठाकरे यांनी व्यवसाय प्रशिक्षण उपक्रम उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाला रोटरी अध्यक्ष महेश उचाके,सचिव श्री मनीष बोराडे, उत्तरवार डॉ आसावरी देवतळे,श्रीकांत रेशीमवाले,कुंगबिहारी परमार,अर्चना उचके,मिलिंद बोडखे इत्यादींची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसाद पान्हेरकर यांनी केले तर आभारप्रदर्शन मनीष बोराडे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी पल्लवी देठे,प्रिया रामटेके ,सौ संगीता चव्हाण पूजा पान्हेरकर ,पूजा राखोंडे, देवराव कोंडेकर ,खुशाल ठलाल, अशोक खाडे यांनी परिश्रम घेतले.
