ताजी बातमी - महाविकास आघाडीमधील मंत्री स्वतः दुचाकीवर बसून दिल्लीला सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी गेले यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी टीका करीत "मी जर राज्याचा मुख्यमंत्री असतो तर तात्काळ बच्चू कडू यांचा राजीनामा घेतला असता".
मंत्री मंडळातील मंत्र्यांना आंदोलन करण्याचा अधिकार नाही, एकतर मंत्री रहा नाहीतर आंदोलन करा, अशी भूमिका आज नागपूर येथे पत्रपरिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.
