गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील निमणी ग्रा.पं. उपसरपंच उमेश राजूरकर यांची संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर पहिली बैठक संपन्न झाली.या बैठकीत संजय गांधी विधवा व अपंग योजनेंतर्गत 41,श्रावणबाळ योजनेंतर्गत 106,इंदिरा गांधी विधवा योजनेंतर्गत 6,इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजनेंतर्गत 22,दुर्धर आजार परितक्त्या सिकलसेल घटस्पोटीत योजनेंतर्गत 6 अशा 181प्रकरणांना मंजूरी प्रदान करण्यात आली.पहिल्याच बैठकीत जास्तीत जास्त प्रमाणात प्रकरणांना मंजूरी मिळाल्याने दीर्घ काळापासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या निराधार विधवा,वृद्ध,अंध,अपंग नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे.
सदर बैठकीला समिती अध्यक्ष उमेश राजूरकर,पदसिद्ध सचिव तथा तहसीलदार महेंद्र वाकलेकर,नायब तहसीलदार प्रवीण चिडे,अशासकीय सदस्य मिलींद ताकसांडे,रेखा घोडाम,प्रमोद पिंपळशेंडे, विलास आडे,अनिल निवलकर,अब्दुल हफिज़ अब्दुल गणी,सौ.कल्पना निमजे, सैय्यद सुहेल अली आदींची उपस्थिती होती.यावेळी नवनियुक्त अध्यक्षासह सदस्यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापने नंतर सर्वच सरकारी समित्यांवर नव्याने नियुक्त्या करण्यात आली असून प्रलंबित समित्यांच्या बैठकांना आता सुरवात झाली आहे.
