ताजी बातमी - आजपर्यंत एकही मराठा समाजातील नेत्याने ओबीसी मधून आरक्षण मागितले नसतांना सरकारमधील मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार व माजी आमदार प्रकाश शेडगे हे राज्यात बेताल वक्तव्ये करून राज्यातील वातावरण खराब करीत आहे.
सरकार मराठा समाजाला आरखान देणार की नाही? ओबीसी समाजाचे आंदोलन हे राज्य पुरस्कृत आहे का असा प्रश्न सुद्धा शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केला आहे.
मराठा आरक्षणावर सरकार गंभीर नाही, यामुळे मराठा समाजातील तरुणांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे, ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी कोणत्याही मराठा समाजातील नेत्याने केली नाही मग मंत्री भुजबळ व वडेट्टीवार असे बेताल वक्तव्य करून मराठा व ओबीसी समजात तेढ निर्माण करण्याच काम का बरं करीत आहे असा प्रश्न सुद्धा आयोजित पत्रपरिषदेत विनायक मेटे यांनी उपस्थित केला.
