मौजा बरांज, त. भद्रावती, जिला - चंद्रपूर (महाराष्ट्र) येथील केपीसीएल (कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमि) च्या माध्यमातून निरंतर स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी व पूर्व कामगारांची पिळवणूक होत असतांना त्यांना यथोचित न्याय मिळणे हा त्यांचा प्राथमिक हक्क आहे. त्यांच्या हक्कांना तिलांजली देण्याचे कार्य केपीसील च्या माध्यमातून होत आहे. केपीसील च्या हेकेखोर भूमिकेला आळा घालून प्रकल्पग्रस्त शेतकरी व पूर्व कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्रीय कोळसा मंत्र्यांनी प्रत्यक्ष हस्तक्षेप करण्याची मागणी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांना नवी दिल्ली येथे प्रत्यक्ष भेटी दरम्यान केली.
सदर कोळसा ब्लॉक चे खनन कार्य बंद असतांना या ब्लॉक मधील उपलब्ध कोळसा साठ्यातून (ग्राउंड स्टॉक) लाखो टन कोळशाची चोरी व हेराफेरी झाली असल्याचे जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी पत्राच्या माध्यमातून उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, मुंबई यांनी कळविले आहे. याबाबत प्रकाशित झालेल्या बातम्यांच्या माध्यमातून हे प्रकरण पुढे आले असून सदर ब्लॉक मध्ये नक्कीच कोळशाची चोरी झाल्याचे यातून निष्पन्न होते. सरकारच्या या अमूल्य खनिज संपत्तीची झालेल्या चोरीची उच्चस्तरीय चौकशी व्हावी असेही यावेळी हंसराज अहीर यांनी कोळसा मंत्र्यांना सुचविले.
केपीसीएल कोल ब्लॉक येथील प्रकल्पग्रस्त व पूर्व कामगार यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच कोळसा चोरी प्रकरणात कर्नाटक सरकारचे ऊर्जा सचिव तसेच केपीसीएल चे व्यवस्थापकीय संचालक यांची बैठक आयोजित करण्याची विनंती यावेळी हंसराज अहीर यांनी मंत्री महोदयांना केली. सरकारच्या माध्यमातून योग्य ती कार्यवाही लवकरच करण्यात येईल असा विश्वास यावेळी कोळसा मंत्री यांनी अहीर यांच्याकडे व्यक्त केला.