ताजी बातमी - देशातील ऑइल कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडर मधील किमतीमध्ये मोठी वाढ केली आहे.
या वाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार असून 14.2 किलोच्या दरात तब्बल 50 रुपयांची वाढ केली आहे.
याचप्रमाणे 5 किलो च्या लहान सिलेंडरच्या दरात 18 रुपयांची वाढ करण्यात आली.
तेल कंपन्या महिन्याच्या पहिल्या दिवशी सिलेंडरचे दर ठरवितात, 1 डिसेंम्बरलाही सिलेंडरच्या दराचा आढावा तेल कंपन्यांनी घेतला होता.
19 किलोच्या सिलेंडरच्या दरात 36 रुपये 50 पैश्यानी वाढ झाली असून बिना सबसिडी चा गॅस सिलेंडरची किंमत 644 रुपये झाली आहे.
