भद्रावती/अब्बास अजानी
भाजपाचे जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भद्रावतीपासून जवळच असलेल्या साखरवाही येथे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते भाजपा जनसंपर्क कार्यालयाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले.
यावेळी भाजयुमो जिल्हा अध्यक्ष आशिष देवतळे, तालुका अध्यक्ष अनिल डोंगरे, जि.प.सदस्य रंजित सोयाम, तालुका महामंत्री विजय आगरे,अजय चार्लेकर,विजय आमटे, विनोद खडसे, विनोद खेवले,रामु बलकी,आतिश चिमुरकर,बापूजी भोगळे,सुरेखाताई पाटील, आशिष वाढई, विनोद खापने, भीमराज आईलवार, शुद्धोधन वानखेड़े, संतोष आईलवार, विनोद पाझारे,सचिन शेरकी, विशाल झाडे, कवीश्वर डाहुले, अमर खापने, गौरव निब्रड, प्रकाश भोगेकर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
