प्रतिनिधी/विक्की गुप्ता
घुगूस - मागील 27 वर्षांपासून घुगूस वासीयांचा नगरपरिषदेसाठी संघर्ष सुरू आहे, आता घुगूस ग्रामपंचायत निवडणुका लागल्याने घुगूस शहरातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत सरळ ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला असताना घुगूस बंद ची हाक पुकारून 100 टक्के शहर बंद केलं.
भाजप, कांग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, बीएसपी, बीआरएसपी, यंग चांदा ब्रिगेड, आरपीआय व इतर संघटनांनी एकत्र येत जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन दिले.
जोपर्यंत घुगूस नगरपरिषद स्थापन होणार नाही तो पर्यंत आमचा लढा असा सुरूच राहणार असा निश्चय सर्व राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
याकरिता प्रशासनाने तात्काळ निर्णय घेत घुगूस नगरपरिषद निवडणूक घ्यावी.
