ताजी बातमी - देशात कोरोना बाधितांच्या आकड्यांनी थैमान घातले असून काही कंपनी कोरोनावर मात करणारे वॅक्सिंन बनवीत आहे मात्र त्यांचा प्रयोग फसताना दिसला.
काही दिवसांपूर्वी कोवॅक्सिन चा डोज घेतलेले हरियाणाचे आरोग्य व गृहमंत्री अनिल वीज यांना कोरोनाची लागणं झाल्याने भारत बायोटेक या कंपनीच्या लसीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अनिल वीज यांनी समाज माध्यमांद्वारे मला कोरोनाची लागणं झाली असून संपर्कात आलेल्या सर्वांनी कोव्हिडं चाचणी करून घेण्याचे आवाहन केले.
या घडामोडीवर भारत बायोटेक कंपनीने स्पष्टीकरण दिलं की त्या को वॅक्सिन ची चाचणी दोन टप्प्यात करण्यात आली आहे, मात्र त्या कोवॅक्सिन चा दुसरा डोज हा 28 दिवसांनी घ्यावा लागतो, लसीची परिणामकारिता ही 14 दिवसांनी दिसून येते.
सध्या अंबालाच्या सिव्हिल रुग्णालयात अनिल वीज यांचेवर उपचार सुरू आहे.
