गडचांदूर/सै.मूम्ताज़ अली:-
अल्ट्राटेक सिमेंट आवारपूर येथे कार्यरत जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथील कामगार शेख रशीद व शेख अब्बास या दोन्ही कामगार भावंडांच्या सेवानिवृत्तीचे औचित्य साधून बँड पथकाने वाजत गाजत कार्यरत स्थळापासून घरापर्यंत थाटामाटात आणण्यात आले.
या दोन्ही भावंडांनी गेले ३८ वर्ष स्थानिक अल्ट्राटेक सिमेंट आवारपूर येथे सेवा दिली.नुकतेच ते सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त यांच्या घरच्या लोकांकडून व गावकऱ्यांकडून त्यांना वाजत-गाजत निरोप देण्यात आला.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुतळ्याजवळ शाल व श्रीफळ देऊन दोन्ही भावंडांचा सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हापरिषद सदस्य शिवचंद्र काळे, बीबी ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रा.आशिष देरकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष शंकर अस्वले, राष्ट्रसंत युवा मंडळ अध्यक्ष निवृत्ती ढवस, उत्तम काळे,विलास राजूरकर,नथ्थु काकडे, गजानन देरकर,अरूण ढवस,शेख सिकंदर, शेख पापा,हत्तीमारे,शेख रहीम,शेख वसीम यांच्यासह गावकर्यांची मोठ्यासंख्यने उपस्थिती होती.
