चंद्रपूर - भारतरत्न, माजी पंतप्रधान, स्व.अटलबिहारी बाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर तर्फे हे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त २४ व २५ डिसेंम्बर ला हे कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
२४ डिसेंम्बर गुरुवार ला महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष(श) डॉ मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात भाजपा महानगर महामंत्री रवींद्र गुरनुले यांच्या पुढाकारातून महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुक वितरणाचा कार्यक्रम आखण्यात आला.सकाळी १० वाजता महानगरातील लालपेठ,बाबूपेठ,नेहरूनगर,तुकुम व जटपूरा गेट येथील मनपाच्या शाळेत नोट बुक वितरण केले जाणार आहे.यासाठी भाजपा नेते गणेश गेडाम,संदीप आगलावे,रवी लोणकर,सचिन कोतपल्लीवार,विठ्ठलराव डुकरे परिश्रम घेत आहेत.
शुक्रवार २५ डिसेंबरला महानगर महामंत्री ब्रिजभूषण पाझारे यांच्या पुढाकारातून तुकुम येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स ११ वाजता नगराध्यक्ष-दक्षिण मंडळ(भाजपा महानगर) संदीप आगलावे यांच्या पुढाकाराने बाबुपेठ येथील भारतरत्न पंतप्रधान स्व अटल बिहारी बाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून आदरांजली व श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे.याच दिवशी दू १२ वाजता पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी देशाला उद्देशून मार्गदर्शन करणार आहेत, याचे थेट प्रसारण लगतच्या श्री संत रविदास सभागृहात करण्यात येणार आहे.विशेष म्हणजे या कार्यक्रमाला लोकनेते आ सुधीरभाऊ मुनगंटीवार व माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांची उपस्थिती राहणार आहे.
समारोपीय कार्यक्रमात सायंकाळी ५वाजता लोकमान्य टिळक कन्या विद्यालय येथे भाजयुमो महानगर तर्फे आयोजित कार्यक्रमात आ सुधीरभाऊ मुनगंटीवार भारतरत्न,पंतप्रधानस्व.अटलबिहारी बाजपेयी यांच्या जीवनावर प्रकाश टाकणार आहेत.
उपरोक्त कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपुर तर्फे जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे, संघटन महामंत्री राजेंद्र गांधी,सुभाष कासंगोट्टूवार,ब्रिजभूषण पाझारे, रवींद्र गुरनुले,महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अंजली घोटेकर,भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर आदींनी केले आहे.
