भद्रावती/अब्बास अजानी
भद्रावतीच्या BSNL कार्यालयात विविध समस्यां असून त्यांचे त्वरित निराकरण करण्यात यावे,अशी मागणी करणारे एक निवेदन भारत दूरसंचार समिती सदस्य प्रवीण महाजन यांनी BSNL चंद्रपूरच्या महाप्रबंधकांना नुकतेच सादर केले.
महाप्रबंधकांना सादर केलेल्या निवेदनात उपविभागीय अभियंत्याचे गोठवलेले पद पुन्हा भरण्यात यावे, रिक्त असलेले लिपिकाचे पद तात्काळ भरण्यात यावे, ग्राहकांना दूरध्वनी देयके घरपोच मिळत नाहीत ती घरपोच देण्यात यावी, देयके तयार करणारे नादुरुस्त प्रिंटर त्वरीत दुरुस्त करण्यात यावे किंवा नवीन प्रिंटर उपलब्ध करुन देण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. मागण्या मंजूर न झाल्यास ग्राहकांना हाताशी धरुन आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही प्रवीण महाजन यांनी निवेदनातून दिला आहे.
