चंद्रपूर - जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत दिनांक 12 व 13 डिसेंबर 2020 या दोन दिवसांच्या कालावधीत राज्यस्तरीय महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने शासनाच्या http:www.mahaswayam.gov.in पोर्टलवर सदर रोजगार मेळाव्याचे इव्हेंट क्रीएट करण्यात आले आहे.
सदर महारोजगार मेळावा हा उद्योजक तसेच बेरोजगार उमेदवारांसाठी एक सुवर्ण संधी आहे. जिल्ह्यातील सर्व औद्योगिक आस्थापना, हॉटेल्स, मॉल्स, दवाखाने, व निरनिराळे औद्योगिक संस्था यांनी त्यांच्या आस्थापनांमधील रिक्त पदे भरण्याकरिता सदर वेबपोर्टलवर नोंदणी करुन मागणी नोंदवावी. मेळाव्यामध्ये आपला सहभाग घेण्याकरिता उद्योजकांनी व उमेदवारांनी http:www.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर भेट द्यावी. तसेच उमेदवार mahaswayam App हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन सुध्दा या सर्व सुविधाचा लाभ घेवू शकता. एका अर्थाने नोकरीच्या शोध आता आपल्या हाताच्या तळव्यावर उपलब्ध झालेला आहे. विशेष म्हणजे याबाबत कोणतेही नोंदणी शुल्क नसून सदर मेळाव्यामध्ये मोफत सहभाग घेता येणार आहे.
याबाबत काही माहिती, अडचनी किंवा मदत हवी असल्यास दूरध्वनी क्रमांक 07172-252295 यावर संपर्क साधावा. सर्व आस्थापना व नोकरी ईच्छुक उमेदवारांनी या संधीचे लाभ घ्यावा व मिळालेल्या संधीच सोने करून घ्यावी असे आवाहन चंद्रपूर युवासेना जिल्हाप्रमुख इंजि. निलेश बेलखेडे यांनी जिल्ह्यातील युवक युवतींना केलेले आहे.
