प्रतिनिधी/विक्की गुप्ता
घुगूस - मागील अनेक वर्षांपासून घुगूस वासीयांचा महत्वपूर्ण संघर्ष म्हणजे घुगूस नगरपरिषद, मात्र अनेकदा नगरपरिषद स्थापनेच्या मार्गावर आडकाठी निर्माण करण्यात आल्या, तब्बल दोन वेळा घुगूस नगरपरिषदेची घोषणा झाली मात्र ती हवेतच विरली.
आता पुन्हा ग्रामपंचायत निवडणुका लागल्या, उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात पण झाली मात्र आता नगरपरिषदेसाठी शेवटची लढाई म्हणून घुगूस येथील सर्वपक्षीय आंदोलन सुरू झाले.
कुणालाही उमेदवारी अर्ज भरू दिला नाही व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत समोर ठिय्या आंदोलन केले, गुरुवारी सर्वपक्षीय शहर बंद करण्यात आले असून नागरिकांनी सुद्धा या बंद ला चांगला प्रतिसाद देत, नगरपरिषदेसाठी होत असलेल्या आंदोलनाला स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद नोंदविला.
घुगूस येथील सर्वपक्षीय आंदोलनाची दखल प्रशासन घेणार का? कारण अजूनपर्यंत प्रशासनाकडून यावर काही अधिसूचना निघालेली नाही.
परंतु घुगूस वासी नगरपरिषद आता नाही तर कधी नाही अशी भूमिका घेतली असून पुढचे आंदोलन व प्रशासनाची भूमिका काय राहणार यावर आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
