गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कढोली खुर्द ग्रामपंचायतचे कम्प्युटर आॅपरेटर,हिरापूर ग्रामपंचायतचे माजी सरपंच प्रमोद कोडापे यांचे धाकटे बंधू प्रवीण छत्रपती कोडापे वयवर्ष अंदाजे 27 यांचे 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास अकाली निधन झाले.सांगोडा फाटा येथे मोटारसायकलची बैलगाडीला धडक बसल्याने अपघात घडल्याची माहिती असून प्रवीणचा याच वर्षी विवाह झाला होता.प्रवीणच्या अशा अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून कोडापे परिवारासह, नातेवाईक, मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे.
