चंद्रपूर - भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपुर तर्फे गुरवारला( २६ नोव्हेबर) संविधान दिन साजरा करण्यात आला.भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात महानगर भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विश्वरत्न व भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून आदरांजली अर्पण केली.
या प्रसंगी महापौर राखी कांचर्लावार ,जेष्ठ नेते प्रमोद कडू,महामंत्री राजेंद्र गांधी ,भाजपा महिला मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष अंजली घोटेकर, महामंत्री प्रज्ञा बोरगमवार, नगरसेवक शितल गुरनुले ,सविता कांबळे,शिला चव्हाण,सपना नामपल्लीवार,पुष्पां उराडे,युवा नेते राहुल घोटेकर,धम्म प्रकाश भस्मे ,स्वप्निल कांबळे, श्याम कनकम, निलेश हिवराळे, राजेश थुल, हितेंद्र वाकडे, विवेक बारसिंगे, प्रसाद शेटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.प्रारंभी डॉ गुलवाडे यांनी आदरांजली अर्पण केली.
यावेळी बोलतांना डॉ मंगेश गुलवाडे म्हणाले,विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना संविधान निर्माता म्हणून ओळखले जाते. देशाचे ते पहिले कायदा मंत्री होते. 26 नोव्हेंबर ला संविधान दिन चे पालन करून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या देशाचे भवितव्य उज्वल करणाऱ्या कार्याला स्मरण करतो, आणि त्यांना आदरांजली अर्पण करतो.देशाला एकसूत्रात बांधण्याचे पवित्र कार्य संविधान मूळे झाले.जातीवाद नष्ट होण्यास या मुळे मोठी मदत झाली व आपण सारे भारतीय ही भावना वाढीस लागून देश एक झाला.
जगातील सर्वात मोठ्या संविधानाची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली.यासाठी जगातील सर्व संविधानाचा अभ्यास संविधान समितीने केला. डॉक्टर बाबासाहेबांचे संविधान म्हणून मानले.संविधान तयार करण्यास 2 वर्ष 11 महिने 17 दिवस लागले. या संविधानामध्ये 448 अनुच्छेद, 12 अनुसुची ,94 संशोधन,48 आर्टिकल आहेत. मूळ संविधान हस्तलिखित स्वरूपात उपलब्ध आहे. 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय संविधान सभेत तर्फे त्याला स्वीकारण्यात आले. आणि 26 नोव्हेंबर 1950 ला लोकतांत्रिक(लोकशाही) सरकार प्रणाली सोबत लागूही करण्यात आले. म्हणून 26 नोव्हेंबरला संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
पूर्वी 26 नोव्हेंबर हा दिवस कायदा दिवस म्हणून साजरा केला जात असे.
29 ऑगस्ट 1947 ला संविधान मसुदा समितीची स्थापना झाली. त्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. या समितीने हिंदी व इंग्रजी मध्ये हस्तलिखित स्वरूपात संविधानाची निर्मिती केली. हे संविधान 24 जानेवारी 1950 ला संविधान सभेच्या 284 सदस्यांनी हस्ताक्षर करून स्वीकारले.आणि नंतर दोन दिवसाने म्हणजे 26 जानेवारी 1950 ला देशात संविधान लागू करण्यात आले.ज्याला आपण प्रजासत्ताक दिन म्हणतो.लोकांनी,लोकांसाठी,लोकांकरिता चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही.त्याचा सूर्य उगवला.
2015 मध्ये पहिल्यांदा 26 नोव्हेंबरला संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आणि आणि तेव्हापासुन आपण संविधान दिन साजरा करतो. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंतीनिमित्त हा दिन संविधान म्हणून साजरा करू अशी घोषणा 19 नोव्हेंबर 2015 ला केली,अशी माहिती त्यांनी दिली. नागरिकांना संविधाना प्रति जागरूक करणे, त्याचप्रमाणे समाजामध्ये संविधानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला.19 नोव्हेंबर 2015 ला भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकार मंत्रालयाने याची अधिकृत घोषणा केली. 26 नोव्हेंबर 2015 ला संविधान दिन साजरा करण्याची परंपरा सुरू झाल्यानंतर आज आपण 6 वा (26 नोव्हेंबर 20) संविधान दिन म्हणजेच पूर्वीचा कायदा दिन साजरा करतो आहे. स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना यानिमित्ताने आपण आठवण त्यांचा सन्मान करतो. या देशातील जनतेला त्यांच्या अधिकाराची न्याय हक्काची ची जाणीव देखील करून देत असतो.असे ही ते म्हणाले.
आपण सारे भारतीय आहोत,सारे भारतीय माझे बांधव आहेत ही भावना चेतवून सर्वांना समान अधिकार-समान न्याय-अभिव्यक्ती स्वातंत्र्य संविधानामुळे मिळाले हे विसरून चालणार नाही.
मी तमाम भारतीय जनता पार्टी च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने संविधान निर्माते विश्वरत्न-भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करतो.असे म्हणून त्यांनी शब्दाला विराम दिला.यावेळी इतर मान्यवरांनी विचार व्यक्त केले.
