ताजी बातमी - वाढीव वीज बिलात सूट द्यावी यासाठी राज्यात भाजपने आंदोलन केले मात्र हे आंदोलन करण्याचा भाजपला मुळीच अधिकार नसल्याचे वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
भाजप सरकारच्या काळात वीज बिल वसुली ही अत्यंत कमी प्रमाणात असल्याने थकबाकी 51 हजार कोटींच्या घरात वाढली.
ही वीज दरवाढ भाजप सरकारच्या कालावधीत वाढली असून असे आंदोलन म्हणजेच मगरिचे अश्रू असल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे.
वाढीव वीज बिल कुणी भरू नये जर महावितरणने तुमची वीज कापली तर घाबरू नये वंचित बहुजन आघाडी तुमची वीज जोडणी करून देणार अशी परखड प्रतिक्रिया आबेडकर यांनी यावेळी मांडली.
