News34 chandrapur गुरू गुरनुले
मुल - हुकुमशाही वृत्तीच्या भ्रष्ट मोदी सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणल्याने मोदी सरकार व भाजपा खासदार राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपने राहुलजीं विरोधात अनेक ठिकाणी खटले दाखल करून त्यांना अडकवण्याचे षडयंत्र रचले आहे.
अशाच एका प्रकरणात गुजरातच्या सुरत कोर्टाने राहुलजींना आज दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. Rahul gandhi sentenced
भारतीय जनता पक्षाच्या या षडयंत्राविरोधात आंदोलन करण्याच्या सूचना प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले व चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी दिलेल्या सूचनेनुसार काँग्रेस नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोष सिंह रावत यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २३ मार्च २०२३ आज दुपारी ४.३० वाजता महात्माजी गांधी यांचे पुतळ्या समोर गांधी चौक मुल येथे भाजप सरकारचा निषेध आंदोलन करण्यात आले. Congress condemned the BJP government
याप्रसंगी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस व माजी न.प.उपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती राकेश रत्नावार, काँग्रेस कमिटी माजी तालुका अध्यक्ष व माजी बाजार समिती सभापती घनश्याम येनुरकर, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष गुरु गुरनुले,महिला काँग्रेस अध्यक्षा रुपाली संतोषवार, ओबीसी काँग्रेस सेलचे प्रदेश सरचिटणीस गुरुदास चौधरी, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष संदीप कारमवार, माजी संचालक डॉ.पद्माकर लेंनगूरे , काँग्रेस ज्येष्ठ पदाधिकारी बंडू भाऊ गुरनुले, आदर्श खरेदी विक्री सह.सोसायटीचे सभापती पुरुषोत्तम भूरसे, समाज सेवक राजू पाटील मारकवार, संचालक विवेक मुत्यलवार, माजी नगसेवक विनोद कामडे, ललिता फुलझेले, सरपंच राहुल मुरकुटे, सरपंच रवींद्र कामडे, उपसरपंच साहिल येंनगटीवार,अतुल गोवर्धन, अन्वर शेख, प्रवीण खानोरकर,गिरीश गाजेवार,शामलता बेलसरे, वैशाली काळे, गणेश रणदिवे, यांचेसह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.