News34 chandrapur
मुंबई/सोलापूर - 2 दिवसांपूर्वी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी अत्याचार ग्रस्त मुलीचा फोटो आपल्या ट्विटर खात्याद्वारे ट्विट केला होता.
त्या प्रकरणी राऊत यांच्यावर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती पुढे येत आहे.
बार्शी येथे काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता, त्या घटनेतील पीडित मुलीचा फोटो संजय राऊत यांनी ट्विट केला, सदर पीडित अल्पवयीन असल्याने तिची ओळख पटली.
त्यामुळे अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलीचा फोटो ट्विट केल्याने राऊत यांच्या अडचणी वाढणार असे चित्र आहे, राऊत यांच्यावर पोक्सो, भांदवी कलम 228 कलम अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.