News34 chandrapur
चंद्रपूर - 3 मार्च शुक्रवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास मद्यधुंद कार चालकाने बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूलाच्या पिल्लर ला जोरदार धडक दिली, या धडकेत वाहन चालक जखमी झाला. Car accident
दुपारी चारचाकी वाहन क्रमांक MH31FE3920 हे वाहन नागपूर च्या दिशेने जायला निघाले होते, वाहनातील चालक हा अति मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याचा वाहनवरील ताबा सुटला व चारचाकी वाहन वरोरा नाका चौकातील स्व. बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलाच्या पिल्लर ला जाऊन धडकले. Chandrapur warora naka chauk
धडक इतकी जोरदार होती की पिल्लरचा काही भाग कोसळून रस्त्यावर आला, अचानक घडलेल्या या अपघाताने चंद्रपूर-नागपूर मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, नागरिकांनी वाहनचालकाला तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे. Chandrapur breaking news