News34 chandrapur
चंद्रपूर : जिल्ह्यात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा दि. 21 फेब्रुवारी ते 21 मार्च 2023 व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दि. 2 मार्च ते 25 मार्च 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा-2023 मधील परीक्षा केंद्राच्या ठिकाणी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत 100 मीटर परीसरात प्रतिबंध करण्यात येत आहे. या कालावधीत परीक्षा केंद्राच्या ठिकाणी 100 मीटर परीसरातंर्गत 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित जमा होणार नाही. SSC exam 2023

परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातंर्गत/ क्षेत्रातंर्गत सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत नियमित व रोजचे वाहतुकी व्यतिरिक्त इतर हालचालींना प्रतिबंध राहील. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर क्षेत्रांतर्गत परीक्षेदरम्यान झेरॉक्स, फॅक्स, एस.टी.डी.बुथ, पेजर, मोबाईल फोन, लॅपटॉप, ई-मेल, इंटरनेट सवलती किंवा इतर कोणतीही कम्युनिकेशन सवलतींना प्रतिबंध राहील. Maharashtra exam board
सदर आदेश चंद्रपूर जिल्ह्यातील उपरोक्त परीक्षेच्या सर्व परीक्षा केंद्राला लागू राहतील. Hsc exam 2023 maharashtra
हा आदेश उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा दि. 21 फेब्रुवारी ते 21 मार्च 2023 व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दि. 2 ते 25 मार्च 2023 या कालावधीत परीक्षा केंद्रावर सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंमलात राहील. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती व इसम प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असे जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी निर्गमित केलेल्या आदेशित नमुद आहे.